Join us

Rinku Rajguru : "पण मी हे विसरले की.....", रिंकू राजगुरुची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:52 AM

गेल्या काही काळात रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

आर्ची होऊन संपूर्ण महाराष्ट्राला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). नागराज मंजुळे यांचा सैराट गाजल्यानंतर रिंकूने कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिंकूदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असून बऱ्याचदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही काळात रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  एथनिक लूकमध्ये दिसून येत आहे.

रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ''मी माझ्या भावना लपवण्याच्या खूप प्रयत्न केला पण मी हे विसरले की माझे डोळेही बोलतात', रिंकूचं हे कॅप्शनही चर्चेचा विषय ठरत आहे.'' रिंकूचं हे कॅप्शम सध्या चर्चेचा विषय ठरला.

आणि डोळे कधी ही खोटं बोलत नाहीत! लव, फायर', अशा अनेक भन्नाट कमेंट रिंकूच्या व्हिडीओवर चाहते करतायेत. तिचा हा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू करताना तिला बॉलिवूडमधल्या अनेक उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं. आताश: रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते 

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटी