Join us  

सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 10:42 AM

पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं.

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. सेलिब्रिटीही लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होतात. यावर्षीही पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 

लालबागचा राजाच्या चरणी सई ताम्हणकर नतमस्तक झाली. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सईने पारंपरिक पेहरावात लालबागचा राजाच्या दरबारात गेल्याचं पाहायला मिळालं. साडी नेसून सईने मराठमोळा लूक केला होता. सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लालबागचा राजाचा दर्शनाचा व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. "नतमस्तक! मोरया!!" असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. 

दरम्यान, सई ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूडही गाजवलं आहे. सईने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'मिमी' या सिनेमातील सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :गणेशोत्सव 2024सई ताम्हणकरसेलिब्रिटी गणेशलालबागचा राजा