मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Saie Tamhankar). आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे सई कायम चर्चेत येत असते. सध्या सई तिच्या प्रियकर अनिश जोग यांच्यासोबत स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करतीये. या व्हेकेशनमधील अनेक फोटो, व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत दिले आहे. यामध्येच तिने येथील एका रेस्टॉरंटमधील फोटो शेअर केला असून यात ती मिरची खाताना दिसत आहे. त्यामुळे विदेशात जाऊन सईवर मिरची खायची वेळ आली की काय? असा मजेशीर प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारला आहे.
सईने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये बसली असून स्पेनमधील काही पारंपरिक पदार्थांचा ती आस्वाद घेत आहे. या पदार्थांमध्ये तळलेली मिरची देखील होती. ही मिरची पाहिल्यावर अनेकांना मुंबईच्या वडापावची आठवण झाली. वडापावची मिरची स्पेनमध्येही मिळते का? असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, सई 'इंडिया लॉकडाउन' या सिनेमात अखेरची झळकली होती. त्यानंतर सध्या ती स्वत:ला वेळ देत आहे. सई स्पेनमध्ये अनिश जोगसोबत गेली आहे. काही महिन्यांपूर्वीच सईने अनिशसोबत असलेल्या प्रेमाची कबुली दिली. अनिश जोग हा प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता आहे. आतापर्यंत अनिशने टाईमप्लीज, व्हायझेड, मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.