Join us

शुभांगी गोखलेंनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या - 'दारू पिऊन पत्ते...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 12:37 PM

सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल काय म्हणाल्या शुभांगी गोखले...

 Shubhangi Gokhale Ganesh Utsav : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी, गल्लीबोळात गणपती विराजमान होतात. गणेशोत्सव साजरा करा, परंतु हा उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. पर्यावरणाकडे लक्ष द्या, असा सल्ला देताना अनेक जण दिसून येतात. नुकतंच मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल स्पष्ट मत मांडलं. 

 शुभांगी गोखले यांचा 'घरत गणपती' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'तारांगण' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी गोखले यांनी गणेशोत्सवाच्या आठवणी आणि बदलेलं स्वरूप यावर त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मी मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो. मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे'.

पुढे त्या म्हणाल्या,  'मराठवाड्यात एवढं स्तोम नाही. टिळकांनी सुरू केल्याने तेव्हा सार्वजनिक गणपतीचे मेळे व्हायचे. ते स्वरूप थोडं कमी होतं किंवा माझ्या वाटल्या एवढं काही आलं नाही. पुण्यात आल्यावर मी पाच मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला. खरं सांगू का म्हणजे त्याच फार अवडंबर झालं आहे. खूप चुकीच्या गोष्टी होतात.  सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो. पण मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत'.

शुंभागी म्हणाल्या, 'रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं. हे तर कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहेआपणच आपल्या देवाचा अपमान करतोय, सार्वजनिक गणपती आता बंद व्हायला हवाय. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत.  एनर्जी वाया जाते. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व प्रकारचं प्रदूषण होतं. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो. कुणा-कुणाच्या घरचा गणपती सुद्धा मोठा असतो', असं स्पष्ट मत शुभांगी गोखले यांनी मांडलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमराठी चित्रपटगणपतीगणेशोत्सवगणेशोत्सव