Join us

'लहान तोंडी खूपच मोठा घास'; आर्या आंबेकरची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:44 IST

Aarya ambekar: अलिकडेच आर्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत येत आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे आर्या आंबेकर. उत्तम गायनशैली, अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर आर्याने आज प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात आर्याही तिचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

अलिकडेच आर्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने एक चॅलेंज स्वीकारल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये आर्या योगप्रकार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा प्रयोग अशस्वी होतो. मात्र, तिने केलेला प्रयत्न प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, Being a beginner at working out, this is लहान तोंडी खूपच मोठा घास, असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसंच हा योगप्रकार करताना काळजी घ्या. नाही तर उगाच माझ्यासारखं होईल असंही तिने सांगितलं. तिच्या या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केली आहे.

टॅग्स :आर्या आंबेकरसेलिब्रिटीसिनेमा