Join us

शंकराची पिंड, उंदीर माामा अन्...; सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची देखणी मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:20 IST

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दरवर्षी स्वत:च्या हाताने बाप्पाची गणेशमुर्ती घडवते. यंदाही सोनालीने मातीपासून गणेशमूर्ती बनवली आहे.

यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर आहे. अवघ्या तीन दिवसांतच घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग असून बाजारपेठाही सजल्या आहेत. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणेश मूर्ती घडवतात. 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दरवर्षी स्वत:च्या हाताने बाप्पाची गणेशमुर्ती घडवते. यंदाही सोनालीने मातीपासून गणेशमूर्ती बनवली आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली तिचा भाऊ अतुलबरोबर गणपतीची मू्र्ती बनवताना दिसत आहे. यंदा सोनालीचा बाप्पा खास असणार आहे. शंकराची पिंड, बाजूला उंदीर आणि गणपती बाप्पा अशी मूर्ती अभिनेत्रीने बनवली आहे. 

'यंदाचा बाप्पा...आमचा गणोबा' असं कॅप्शन सोनालीने या व्हिडिओला दिलं आहे. सोनालीने बनवलेली ही गणेश मूर्ती पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. "खूपच सुंदर", "मस्तच", "गणपती खूप सुंदर झालाय" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०२४सेलिब्रिटी गणेशसोनाली कुलकर्णी