Join us  

Sonalee Kulkarni : “मुळात तुझे फोटो इतके भारी कसे येतात?” सोनालीच्या फोटोंवर कुशल बद्रिकेची कमेंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:32 AM

Sonalee Kulkarni, Kushal Badrike : . सोनालीने फोटो शेअर केलेत आणि हे फोटो पाहून चाहतेच काय तर सेलिब्रिटीही थक्क झालेत. अभिनेता कुशल बद्रीके त्यापैकीच एक.

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) तिचा अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तिचा दमदार अभिनय, अप्सरेसारखं सौंदर्य, तिचा फिटनेस आणि बहारदार नृत्य सगळंच खास. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे.  स्वत:चे रोज नवे सुंदर, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. तिने फोटो शेअर करायची देर की, चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतो. सगळेच तिच्या फोटोंच्या प्रेमात पडतात. आत्ताही तेच. सोनालीने फोटो शेअर केलेत आणि हे फोटो पाहून चाहतेच काय तर सेलिब्रिटीही थक्क झालेत. अभिनेता कुशल बद्रीके (Kushal Badrike ) त्यापैकीच एक.

 निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनालीने नवं फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सोनाली आनंदाने बेभान झालेली दिसतेय. “मैंने अपने आँचल से आसमाँ पर बादल कोरें हैं, कोई शक़ हो गर तो इस नीले रंग से पूछ लेना”, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर कुशल बद्रीकेही फिदा झाला. ‘मुळात तुझे फोटो इतके भारी येतातच कसे? खूपच मस्त’, अशी कमेंट कुशल बद्रिकेने तिच्या या फोटोंवर केली.

कुशलच्या या कमेंटवर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कारण त्या अप्सरा आहेत’, अशी कमेंट एकाने दिली आहे. अन्य एकाने तिला फोटोंसाठी पोज देण्याची योग्य समजही आहे, असं म्हटलं आहे. अद्याप सोनालीने कुशल बद्रिकेच्या कमेंटला उत्तर दिलेलं नाही. ती काय उत्तर देते ते बघूच.

सोनालीने एका माहितीपटाच्या शूटिंगसाठी पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला होता.  त्यानंतर तिला पहिली मराठी मालिका मिळाली. ई- टीव्हीवरील ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेतून सोनालीने खऱ्या अर्थाने अभिनय प्रवास सुरू केला. वडील मराठी आणि आई पंजाबी असल्यामुळे सोनाली लहानपणापासूनच घरात हिंदीमध्येच बोलायची. त्यामुळे सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिला नीट मराठी बोलता येत नव्हतं. पण सोनालीने सगळ्या कमतरतांवर मात करत, एक आघाडीची अभिनेत्री होईपर्यंतचा पल्ला गाठला.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीकुशल बद्रिकेमराठी अभिनेता