Join us  

कसा वाटला?, सोनाली कुलकर्णीने विचारला प्रश्न, चाहते म्हणाले- एकदम भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:06 PM

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) संजय जाधव यांच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या संगीतमय चित्रपटात तिच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. उत्कंठा कायम ठेवण्यासाठी नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील 'शेफाली' या सोनाली कुलकर्णीच्या पात्राचा लूक प्रदर्शित करण्यात आला. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे या चित्रपटातील रंग लागला गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

या गाण्यासंदर्भातील एक पोस्ट सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केली आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय 2 दिवसात 1.5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाल्याचं सोनालीने सोशल प्लॉटर्फॉमवरून सांगितलं होतं.

या गाण्यातील लूकचे फोटो सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना तो कसा वाटला? असे विचारले आहे. अती सुंदर, मस्त, एकदम भारी, खुपच खुपच मस्त अगदी तुझासारखं, अशा कमेंट्स तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी करत गाणं आवडल्याची पोचपावती दिली आहे.

 

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी