Join us

सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 3:10 PM

मागच्या वर्षी सोनालीची आजी गेली. म्हणून यंदा तिने आजीच्या आठवणीत ही खास मूर्ती घडवली आहे.

घरोघरी गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. गणेशच्या स्थापनेआधी आकर्षक सजावट असो किंवा अगदी हाताने मूर्ती घडवणं असो सगळ्याच कामांची लगबग सुरु आहे. उद्या बाप्पा येतोय म्हणल्यावर नैवेद्याचीही खास तयारी सुरु असते. बाप्पाला आवडणारा मोदक तर प्रत्येक घरात बनवला जातोच. सेलिब्रिटीही गणेश आगमनासाठी सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) स्वत: शाडूच्या मातीने बाप्पाची मूर्ती घडवली आहे. मूर्तीचं रुप आणि त्यामागचं कारण फार खास आहे. बघुया सोनालीने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीची काय आहे कहाणी

सोनाली म्हणाली, 'मागच्या वर्षी सोनालीची आजी गेली. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र यंदाची बाप्पाची मूर्ती आजीला समर्पित केली आहे. आमचे आजी आजोबा देहू ला राहायचे. तिथेच आमचं बालपण गेलं. शिक्षणही झालं. देहूगावशी आमचं खास नातं आहे. त्यामुळे यंदा देहूगाव आणि आजी आजोबांच्या जवळचं नातं असलेलं गणपतीचं रुप आम्ही बनवतोय. गेल्या ५ वर्षांपासून मी आणि माझा भाऊ घरीच मूर्ती साकारतोय. पहिल्या वर्षी आम्ही अगदी साधी मूर्ती घडवली, दुसऱ्या वर्षी बालगणेशा, तिसऱ्या वर्षी शंकराच्या रुपातील बाप्पा, चौथ्या वर्षी पुन्हा बालगणेशा.'

मी आणि माझा भाऊ मूर्ती बनवत असताना माझी आजी दारापाशी बसून बारीक लक्ष द्यायची, सूचना करायची. यंदाचा गणेशोत्सव आम्ही तिच्याशिवाय साजरा करतोय अर्थात तिची आठवण येतीये म्हणूनच तिला आणि देहूगावला समर्पित आहे यंदाचा आमचा हा बाप्पा. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या रुपातला आमचा बाप्पा.'

सोनालीने वारकरी संप्रदायाला, देहू गावाला आणि आजीला समर्पित ही तुकाराम महाराजांच्या रुपातील गणेश मूर्ती घडवली आहे. तिच्या या विचारांचं खूपच कौतुक होतंय.'खूपच सुरेख गणपती मूर्ती बनवली तुम्ही सोनाली त्यात आपल्या महाराष्ट्राची वारकरी समुदायाची संस्कृती दाखवली त्यामुळेच तुम्हाला म्हाराष्ट्राची अप्सरा संबोधलं आहे' अशी कमेंट एकाने केली आहे. सोनालीने तिच्या युट्यूब चॅनलवर गणेश मूर्ती साकारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच गणेशोत्सवाला तिच्या घरी कशी धामधूम असणार आहे हेही तिने लाईव्ह करत दाखवणार आहे.

टॅग्स :गणेशोत्सवसेलिब्रिटी गणेशसोनाली कुलकर्णीमराठी अभिनेताइको फ्रेंडली गणपती 2023