सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आज ६० वाढदिवस साजरा करत आहे. कालच त्याने मीडियासोबत वाढदिवसाचं सेलीब्रेशन केलं. यावेळी त्याने गर्लफ्रेंडलाही समोर आणलं. आमिर गेल्या दीड वर्षांपासून गौरी स्प्रॅट या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आज आमिरच्या वाढदिवसाला सगळीकडे त्याच्या गर्लफ्रेंडचीच चर्चा आहे. आमिर खानबॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. 'दिल चाहता है' या गाजलेल्या सिनेमात आमिरसोबत मराठमोळी सोनाली कुलकर्णीही (Sonali Kulkarni) झळकली होती. सोनालीने नुकतंच सोशल मिडिया पोस्ट करत आमिरला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आमिरसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, "प्रिय प्रिय आमिर, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू सर्वोत्कृष्ट आहेस. खूप प्रेम. खूप शुभेच्छा."
सोनाली गेल्या वर्षीच आमिरची लेक आयराच्या खानच्या रिसेप्शन सोहळ्याला गेली होती. तिथे दोघांची भेट झाली आणि 'दिल चाहता है'च्या आठवणी ताज्या झाल्या. सिनेमात सोनाली सैफ अली खानच्या अपोझिट होती. मात्र आमिरसोबतही तिची चांगली मैत्री झाली.
आमिर खान वयाच्या ६० व्या वर्षी 'गौरी'च्या प्रेमात, मुलांची कशी होती प्रतिक्रिया? म्हणाला...
आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी कोण आहे?
आमिर खानने ६० व्या वाढदिवशी सर्वांनाच मोठं सरप्राईज दिलं. तो बंगळुरुच्या गौरी स्प्रॅट या महिलेला डेट करतोय. २४५ वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखतात. तर गेल्या दीड वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. गौरी ही एका मुलाची आई आहे. ती चांगल्या पार्टनरच्या शोधात होती आणि आमिरसोबतच तिचं सूत जुळलं. गौरीचं मुंबईत एक सलून आहे आणि ती आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्येही काम करते.