Join us  

"ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज...", सोनाली कुलकर्णीची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 3:04 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. सोनालीने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे, 

सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज घेऊन आलीये शेफाली 🎤 'तमाशा LIVE'(Tamasha Live) 15 जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चं टिझर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची उत्सुकता खूप वाढली होती.

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी सोबत सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसिनेमा