Join us

'बाईपण भारी देवा' फेम सुकन्या मोनेंचं खरं नाव माहितीए का? नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:03 IST

वडिलांनी ठेवलेलं नाव आईला आवडलंच नाही म्हणून...

मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी (Sukanya Mone) मोने म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक दिलखुलास व्यक्तिमत्व. अतिशय गोड अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या सुकन्या मोने यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बाईपण भारी देवा' सिनेमा सुपरहिट झाला. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीचं खरं नाव वेगळंच आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? होय सुकन्या मोने यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव वेगळंच ठेवण्यात आलं होतं.

अभिनेत्री सुकन्या मोने यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचं कुटुंब चाळीतून ब्लॉकमध्ये शिफ्ट झालं. लेकीचा जन्म होताच चाळीतून मोठ्या घरात जाता आल्याने वडिलांनी त्यांचं नाव धनश्री असं ठेवलं. धनाची पेटी अशा आशयाने त्यांनी धनश्री हे नाव ठेवलं होतं. पण त्यांच्या आईला मात्र हे नाव रुचलं नाही. हे फारच कॉमन नाव असल्याचं तिला वाटलं होतं. त्यामुळे आईने मुलीचं नाव सुकन्या असं ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणेच त्यांनी मोठं व्हावं अशी आईची इच्छा होती.  त्यामुळे नंतर अभिनेत्रीनेही नावाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. सुकन्या मोनेंनी हा किस्सा 'दिल के करीब' या मुलाखतीत सांगितला होता.

सुकन्या मोने यांनी 'या सुखांनो या', 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी' अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळा ठसा उमटवला आहे. मधल्या काळात त्यांचा भयानक अपघात झाला होता. यानंतर त्यांचं वजन वाढलं. त्यामुळे त्या नृत्यापासून दूर गेल्या होत्या. मात्र बऱ्याच वर्षांनी त्यांनी सर्व शारिरीक दुखापतींवर मात करत पुन्हा नृत्यात कमबॅक केलं. सिनेइंडस्ट्रीतील सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीमराठी अभिनेतामराठी चित्रपट