Join us

"हे संशयास्पद वाटतंय...", रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचा व्हिडिओ शेअर करत सुकन्या मोनेंची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:47 IST

सुकन्या मोनेंनी शेअर केला रस्त्यावरील भीक मागणाऱ्या मुलांचा व्हिडिओ, म्हणाल्या, "कुठलेच मायबाप..."

सुकन्या मोने या मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आभाळमाया, वादळवाट अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याबरोबरच नाटक आणि सिनेमांतही काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. २०२३मध्ये प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा त्यांचा सिनेमा प्रचंड गाजला. सुकन्या या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच त्या अनेकदा पोस्टही शेअर करतात. 

सध्या सुकन्या मोनेंच्या अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुकन्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही लहान मुले रस्त्यावर भीक मागताना दिसत आहेत. त्यांच्या अंगाला रंग फासून त्यांना रस्त्यावर उभं करण्यात आल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुकन्या मोने यांनी संताप व्यक्त केला आहे. "मला एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर हा व्हिडिओ आला आणि अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपणा पैकीच कोणाचीतरी बेपत्ता झालेली असु शकतात ? कुठलेच माय-बाप आपल्या मुला-मुलींना अश्या पद्धतीने पैश्यांन साठी उघड्याने नाही सोडत, हे सगळे संशयस्पद आहे..!! कोणी ह्याची दखल घेईल का?", असं त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. 

सुकन्या मोनेंनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीसेलिब्रिटी