Join us

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉलिवूड सिनेमातही केलं आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 09:41 IST

मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्री गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे. 

सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तर काही जण बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्री गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे. 

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवची लगीनघाई सुरू आहे. तेजश्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला. बॉयफ्रेंड रोहन सिंगबरोबर तेजश्रीने साखरपुडा केला आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तेजश्रीचा साखरपुडा पार पडला. या खास क्षणासाठी तेजश्रीने हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. तर रोहनने तिला ट्विनिंग करत हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातलं होतं. साखरपुड्यातील काही खास क्षणांचे फोटो तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने प्रेमाची कबुली दिली होती. तेजश्रीच्या बॉयफ्रेंडने समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज करत तिला लग्नाची मागणी घातली होती. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. तेजश्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रविण तरडे मुख्य भूमिकेत असलेल्या 'बलोच' या सिनेमात ती झळकली होती. तिने सोनाक्षी सिन्हाबरोबरही काम केलं आहे.  २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'अकिरा' सिनेमातून तेजश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने सोनाक्षी सिन्हाबरोबर स्क्रीन शेअर केले होते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग