मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयानं तिने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री नसते, तर मी कदाचित शिक्षिका असते तेजस्विनीने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात तेजस्विनी पंडितने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ती म्हणाली, 'मी शिक्षिकाचं व्हायला हवं होतं. मी माझ्या घरी खूप ज्ञान पाजळत असते. घरी मी आईला आणि बहिणीला 'हे का नाही केलसं तु, हे का केलसं तु, येथे आवाज का नाही उठवलास तु, येथे त्यांची चूक का दाखवून दिली नाहीस' अशा छोट्या-छोट्या गोष्टींवरुन त्यांना काही ना काही सांगत असते'.
याशिवाय, इंडस्ट्रीतील गटबाजी, रिलेशनशिप या सर्व चर्चांवर ती म्हणाली, "मी कधी कोणत्याच गटात नव्हते. लोक उगाच म्हणतात मी संजय जाधव यांच्या गटात होते. पण उलट माझ्यापेक्षा जास्त सईने संजयदादाच्या सिनेमात काम केलं आहे. मी त्याची ऑफस्क्रीन खूप चांगली मैत्रिण आहे. पण ऑनस्क्रीन मी त्याच्या फक्त 'तू ही रे' आणि 'ये रे ये रे पैसा' या दोनच सिनेमात काम केलं आहे. बाकी मी त्याच्याकडे चित्रपट केलेच नाहीयेत."
तेजस्विनी पंडितने 'रानबाजार' मध्ये बोल्ड भूमिका साकारली. शिवाय तिची आणि स्वप्नील जोशीची 'समांतर' ही वेबसिरीजही गाजली. शिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे.'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट.तसंच 'अथांग' या थरारक वेबसिरीजचीही तिने निर्मिती केली आहे.