अनेक सेलिब्रिटी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आपल्या चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधले अपडेट देणं सेलिब्रिटीही पसंत करतात. काही सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे त्यांची मतंही मांडताना दिसतात. समाजात घडणाऱ्या गोष्टींबाबत अनेकदा सेलिब्रिची व्यक्त होताना दिसतात. कलाकारांच्या या पोस्ट व्हायरलही होताना दिसतात. आतादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अशीच एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्टमधून धर्म आणि जातीवर भाष्य केलं आहे. हे करताना तिने लग्नाचं उदाहरण दिलं आहे. "लग्न करताना धर्म बदलण्याची सोय आहे, तर जात बदलण्याची पण असूच शकते ना- एक विचार", असं अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून वीणा जामकर आहे.
वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. वीणाने 'तप्तपदी', 'लालबागची राणी', 'बायोस्कोप', 'गारभीचा पाऊस', 'कुटुंब', 'लालबाग परळ', 'भाकरखाडी', 'आणीबाणी' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.