Join us

'झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं..'वर विशाखाने धरला ताल; एक्स्प्रेशन्स अन् डान्स स्टेपने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:44 IST

Vishakha subhedar: तुम्ही पाहिला का विशाखाचा अफलातून डान्स व्हिडीओ

 छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा उत्तम अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायमच चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे विशाखाला डान्सची भलतीच आवड असून ती कायम तिचे व्हिडीओ शेअर करत असते.

विशाखाला अभिनयासह डान्सचीही प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. इतकंच कशाला तिला आवडणाऱ्या गाण्यांवरही ती डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मध्यंतरी तिने ढोलकीच्या तालावर या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर तिने पुन्हा एक  नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.

इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी विशाखा सुभेदार ट्रेनमध्ये विकायची ड्रेस मटेरिअल; वाचा तिची स्ट्रगल स्टोरी

विशाखाने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने निसर्गाच्या सानिध्यात छान डान्स केला आहे. "झुंजुर-मुंजुर पाउस माऱ्यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं," या गाण्यावर तिने ताल धरला आहे. तिच्या या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.

 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी