Join us

जे बात ! मराठमोळ्या या अभिनेत्रीचा नवरा दिवाळी फराळ परदेशात विकून झालाय कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 6:00 AM

एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ आणि सांभाळतो कोट्यवधींचा व्याप

दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दिव्यांची रोषणाई, फटाके आणि फराळ. दिवाळीत प्रत्येकाच्या घरात फराळ असतोच असतो मग तो कुणी घरात बनवतो तर कुणी विकतचा आणतो. भारताप्रमाणे परदेशातही दिवाळी साजरी केली जाते. विशेष करून तिथे स्थायिक असलेले भारतीय इथल्या प्रमाणे दिवाळीतील रितीरिवाज तिथे न चुकता करतात. त्यामुळे दिवाळीच्या फराळाला देशातच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी असते. म्हणूनच दिवाळीचा फराळ विकून कोट्यधीश झालेली अनेक कुटुंबही आपल्याला दिसतात. असेच एक कुटुंब म्हणजे गोडबोले कुटुंब. होय, गोडबोलेंच्या फराळाला थेट परदेशातून मागणी असते. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती हा सगळा कोट्यवधींचा व्याप सांभाळतो. या अभिनेत्रीचे नाव आहे किशोरी गोडबोले.

किशोरी गोडबोलेचा नवरा सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून तिचा व्यवसाय सांभाळण्याची गळ घातली आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा, तिच्या घरी याच गोडबोलेंचा फराळ पोहोचायचा. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशांत राहणाऱ्या भारतीयांत अशी काही ख्याती पसरली की, या फराळाची मागणी वाढली. पुढे त्यांनी दिवाळी फराळासोबत ड्राय फ्रुट आणि पॅकेटिंग काड्या पदार्थाना देखील समावेश केला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. जे लोक ह्यांच्याकडून ऑर्डर घेत ते समाधानी असल्याने तेच त्यांच्या पब्लिसिटीचे माध्यम ठरले आणि व्यवसाय वाढत गेला.

सचिन गोडबोले यांचा मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरी हिच्यासोबत विवाह झाला.

किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.

टॅग्स :किशोरी गोडबोलेदिवाळी 2022