कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असले तरी मराठी कलाकारांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मी महाराष्ट्र आहे हे गाणं काल रिलीज केले होते. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
मी महाराष्ट्र आहे या गाणे गाणाऱ्या या गायकांमध्ये मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषिक गायक सुद्धा आहेत. एवढंच नाही तर या गाण्याला संगीत दिलंय श्रीधर नागराज या एका अमराठी तरुणाने, या गाण्याच्या विडीयो चं संकलन करणारा एडेल जेरम परेरा सुद्धा मराठी नसला तरी महाराष्ट्रीय आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला नवं चैतन्य देण्याचा प्रयत्न हे दिग्गज गायक आणि कलाकार आपल्याला करताना दिसणार आहेत.
स्नेहल काळे यांच्या संकल्पनेला शब्दांत बांधलय मकरंद सखाराम सावंत याने, साउंड डिजाईनिंग केलंय हिमांशू शिर्लेकर, गाण्याच्या विडीयो चं दिग्दर्शन केलं आहे निशांत कंदलकर यांनी. नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे अजिंक्य शिंदे यांनी आणि पब्लिसिटी डिजाईन हाताळलं आहे पुष्कर गोडबोले यांनी. कधीही न झुकणारं महाराष्ट्राचं स्पिरिट आणि महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान या कलाकारांनी गाण्यातून मांडला आहे.