Join us

अंकुश चौधरीच्या लेकाला पाहिलंय का? पत्नी दीपाची खास पोस्ट; म्हणाली- "११ वर्ष सातत्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:51 IST

अभिनेता अंकुश चौधरीची त्याची पत्नी दीपा परबने त्यांचा मुलगा प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

Deepa Parab Post: अभिनेता अंकुश चौधरीची (Ankush chaudhary) त्याची पत्नी दीपा परब (Deepa Parab) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकुशप्रमाणे दीपादेखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे. अलिकडेच दीपा परब ही झी मराठी वाहिनीवरली 'तू चाल पुढं' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. शिवाय 'बाई पण भारी देवा' या चित्रपटात तिने केलेल्या कामाचंही सर्वत्र कौतुक करण्यात आलं. दीपाने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अंकुश आणि दीपाने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली त्यांच्या सुखी संसाराला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्यांना ११ वर्षांचा मुलगा देखील आहे. अशातच आपला मुलगा प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर दीपा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्याद्वारे ती निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना आपल्याविषयी अपडेट देत असते. अशातच नुकतीच अभिनेत्रीने तिच्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर  पोस्ट शेअर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहलंय, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिन्स! ११ वर्ष जसं सातत्याने आमच्या चेहऱ्यावर आणि आयुष्यात आनंद आणतो आहेस तसाच सदैव राहा आणि खूप खूप मोठा हो."

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर स्वप्नील जोशी, अमृता खाानविलकर या कलाकरांनी प्रतिक्रिया देत प्रिन्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अंकुश चौधरीने ही पोस्ट रि-शेअर केली आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरीमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया