Join us

"आपण सगळीकडे असावं हा अट्टाहास...", भूषण प्रधान छोट्या पडद्यावर परतणार? अभिनेत्याने खरं काय ते सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:36 IST

मराठी सिने-इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता भूषण प्रधान.

Bhushan Pradhan: मराठी सिने-इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan).'कॉफी आणि बरंच काही', 'निवडुंग', 'मिसमॅच' यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 'पिंजरा' तसेच 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेतील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भूषण प्रधानने मालिकांमध्ये काम करण्याचू इच्छा व्यक्त केली आहे. 

अलिकडेच भूषण प्रधानने 'कलाकृती मीडिया'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्याला पुन्हा छोट्या पडद्याकडे वळण्याचा असा काही विचार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना भूषण प्रधान म्हणाला, "आता 'पिंजरा'नंतर मी आठ वर्षांनी 'जय भवानी जय शिवाजी' मालिका केली. ही ऐतिहासिक मालिका केल्याने मला वेगळंच समाधान मिळालं. ज्यामध्ये एक कलाकार म्हणून खूप काही शिकलो. याशिवाय महाराजांची भूमिका करुन बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यामुळे एक कलाकार म्हणून ग्रो झालो. हे सगळं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. अशा आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळाल्या तर नक्की करेन."

पुढे अभिनेत्याने सांगितलं, "पण, मला आता चांगल्या सिनेमांच्या ऑफर येत आहेत. त्यामुळे मला सिनेमांवरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचबरोबर ही संधी इतर कलाकारांनाही मिळते आहे. खूप चांगल्या कलाकारांच्या उत्तम मालिका मिळत आहेत. आपण सगळीकडे असावं हा अट्टाहास नाही आहे. सिनेमे मिळत आहेत त्याचप्रमाणे इतर कलाकारांना मालिका करु द्या. पण, सध्या मालिका करण्याचा विचार नाही. कारण, सिनेमे चांगले चालू आहेत. एखादी मालिका करायची त्याला कमी दिवस द्यायचे आणि इतरांचे हाल करायचे हे मला पटत नाही." असं स्पष्ट मत अभिनेत्याने मांडलं. 

टॅग्स :भुषण प्रधानमराठी अभिनेतासेलिब्रिटी