Join us

"दहा बाय दहाच्या खोलीत १४ जण..," बालपणीच्या आठवणीत रमले शिवाजी साटम; शेअर केले खास अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:55 AM

अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) सध्या 'सीआयडी'मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Shivaji Satam : अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) सध्या सीआयडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीआयडी (CID) आता पुन्हा सुरु होणार आहे. शोची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेत अभिनेते शिवाजी साटम एकदम स्टाईलमध्ये दिसत आहेत. शिवाजी साटम यांनी मराठीसह हिंदी मालिका चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण केला आहे. अशातच त्यांनी आयुष्यातील संघर्ष काळावर भाष्य करत आठवणींना उजाळा दिला.

नुकतीच शिवाजी साटम यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली.या मुलाखतीत त्यांनी बालपणीचा काळ तसेच चाळीतली जीवनावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान अभिनेते म्हणाले, "माझे वडील मिलमध्ये कामाला होते. त्यानंतर त्यांच्यामागे हळहळू सगळे भाऊ मुंबईत आले. कुटुंबात असे चौदा सदस्य होते. दहा बाय दहाच्या दोन खोल्या होत्या, त्यामध्ये आम्ही सगळे राहायचो. आमच्या चाळीचं नाव 'नवी चाळ' होतं. मुळात ती नवीन नव्हती, हलती डुलती चाळ होती. पण ती चाळ कधीही पडली नाही. आता ती चाळ पाडून ४ वर्षे झाली". 

पुढे अभिनेते म्हणाले, "माझं बालपण हे चाळीतच गेलं. अगदी सहावीपर्यंत मी तिकडेच होतो. काल परवाच मी तिथे जाऊन आलो सगळे मित्र मला भेटले. माझ्याबरोबरीच्या मित्रांसोबत भेट झाली. तिथे असताना नाटक वगैरे पाहण्याची आवड निर्माण झाली, तेव्हापासून नाटकात काम करण्याचं इच्छा निर्माण झाली".

कुछ तो गडबड है दया..! हा टेलिव्हिजनवरचा डायलॉग भलताच गाजला होता. सीआयडी या लोकप्रिय मालिकेत एसीपींची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यामुळे घराघरात पोहोचले. आजही त्यांना एसीपी प्रद्युम्नय याच नावाने ओळखलं जातं.

टॅग्स :शिवाजी साटमसीआयडीमराठी अभिनेतासेलिब्रिटी