Join us

"महाराष्ट्रामध्ये आपला मराठी बाणा कमी पडतो...", पुष्कर जोग नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:43 IST

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या हार्दिक शुभेच्छा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

Pushkar Jog: अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या हार्दिक शुभेच्छा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात त्यांच्यासह अभिनेत्री हेमल इंगले मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. पुष्कर जोग(Pushkar हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे सुद्धा चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने थिएटरमध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

नुकतीच पुष्कर जोगने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, " मी तर म्हणतो आता थोडी दादागिरी केली पाहिजे. आमची मुंबई आहे इथे थिएटरमध्ये आमचे मराठी चित्रपट लागले पाहिजेत. यासाठी प्रशासनाने देखील सक्ती केली पाहिजे, की इथे मराठी चित्रपट लागले पाहिजेत. बऱ्याच थिएटरमध्ये हिंदी चित्रपटांचे स्टॅंडी लावलेले असतात. आमचे का लावत नाही? असले तरी ते कुठे एका कोपऱ्यात असतात. या गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे."

यापुढे पुष्कर म्हणाला, "महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाच महत्व दिलं जाणार, हे जोपर्यंत सक्तीचं केलं जात नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. शिवाय थोडी दादागिरी देखील केली पाहिजे. मला तर असं वाटतं कलाकार होण्यापेक्षा मी गुंड वगैरे असतो तर बरं झालं असतं.  म्हणजे माझी मराठी चित्रपटांबाबत ही तळमळ आहे. मला जे काही प्रेम दिलं ते माझ्या मराठी प्रेक्षकांनी दिलं आहे. माझा मराठी चित्रपट मोठा व्हावा, हीच त्याची परतफेड आहे."

महाराष्ट्रामध्येच आपला मराठी बाणा थोडा कमी पडतो...

"फक्त फिल्म इंडस्ट्रीत नाहीतर इतर इंडस्ट्रीकडे पाहिल्यावर मला जाणवली की, एकूणच मराठीमध्ये ती वृत्ती आहे का? मला माहित नाही की, मराठी माणूस मोठा झालेला मराठी माणसालाच बघवत नाही. पण, याउलट आपण हिंदी आणि साउथ फिल्म इंडस्ट्रकडे पाहिलं तर त्या लोकांमध्ये चांगली एकी आहे. ते लोकं एकमेकांना पाठिंबा देतात. पुढे घेऊन जातात. पण, आपल्याच महाराष्ट्रामध्येच आपला मराठी बाणा थोडा कमी पडतो. मराठी माणसालाच महाराष्ट्रात किंमत राहिलेली नाही." अशी खदखद पुष्कर जोगने व्यक्त केली. 

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतासेलिब्रिटी