Join us

"त्यानंतर मी मालिका केलीच नाही..." अभिनेता संतोष जुवेकरचं वक्तव्य चर्चेत! पुन्हा मालिकेत कमबॅक करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 17:24 IST

सध्या मराठी मनोरंजन विश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' चित्रपटाची चर्चा आहे.

Santosh Juvekar: सध्या मराठी मनोरंजन विश्वात समित कक्कड दिग्दर्शित  'रानटी' (Ranti)चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेतासंतोष जुवेकरही (Santosh Juvekar) 'रानटी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने मराठीसह हिंदी सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दरम्यान 'रानटी' चित्रपटाच्या निमित्ताने संतोष जुवेकर वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. अशातच एका मुलाखतीत संतोषने त्याने काम केलेल्या टीव्ही मालिकांबद्दल भाष्य केलं आहे.

संतोष जुवेकरने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "मी ज्या मालिका केल्यात जसं की, 'या गोजिरवाण्या घरात', 'वादळवाट' असेल 'दुनियादारी', 'क्या बात है' त्या सिरिअल्समधील कॅरेक्टर्स मी मिस करतो. मी खूप नशीबवान आहे की मला चांगल्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 'अस्सं सासर सुरेख बाई' ही माझी शेवटची मालिका होती. त्यानंतर मी मालिका केलीच नाही. त्यामध्ये साकारलेली पात्रं लोकांच्या अजूनही लक्षात आहेत."

पुढे अभिनेता म्हणाला, "अजूनही लोकं मला मालिकांमधील नावाने हाक मारतात. शेखर परांजपे म्हणून ते मला ओळखतात. माझ्यासाठी तरी टेलिव्हिजन शॉर्ट मेमरी नाही. खरं सांगायचं झालं तर मी टीव्हीला मिस करतो. त्यापासून मी थोडा दूरावलोय. पण, नक्कीच मला टीव्हीवर काम करायला आवडेल."

संतोष जुवेकर हा मराठी कलाविश्वातील राऊडी अभिनेता आहे. मोरया, झेंडा या सिनेमांतून घराघरात पोहोचलेल्या संतोषने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनंही जिंकली. संतोषचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेतासिनेमा