Join us  

देशमुखांच्या घरी बाप्पाचं आगमन; चिमुकल्यांनी केली लाडक्या गणरायाची आरती, नेटकऱ्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 5:24 PM

अभिनेता रितेश देशमुखच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ritesh Deshmukh Ganpati 2o24 : सध्या संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींच्या घरीही लाडके गणराय विराजमान झाले आहेत. अशातच लय भारी अभिनेता रितेश देशमुखच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री जिनिलिया देशमुखने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

देशमुखांच्या घरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अख्खं देशमुख कुटुंब एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या आरतीत सगळे मग्न झाले आहेत. यंदाचा देशमुखांच्या घरातील गणरायाची मूर्ती अतिशय रेखीव आणि सुबक आहे. अत्यंत साध्या पद्धतीने सजावट करत त्यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रितेश-जिनिलियाच्या मुलं आपल्या हाताते बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. हातात आरतीचं ताट घेऊन देशमुखांच्या घरातील चिमुकले गणरायाच्या आराधना करत आहेत. व्हिडीओमध्ये रितेश-जिनिलिया देखील पारंपरिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. तसेच त्यांच्या मुलांनी डोक्यात टोपी आणि सुंदर असे कुर्ते परिधान केले आहेत.

रितेश-जिनिलियाच्या मुलांच्या संस्काराची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. रिआन आणि राहीलवर या दाम्पत्याने चांगले संस्कार केले आहेत याची प्रचिती अनेकदा येते. देशमुख कुटुंबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आरतीमध्ये आमदार अमित देशमुख त्यांची पत्नी आदिती देशमुख तसेच लहन भाऊ धीरज देशमुखसह पत्नी दीपशिखा देशमुख आणि रितेश-जिनिलिया आणि त्यांची मुले देखील दिसत आहेत. 

रितेश आणि जिनिलिया देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. सोशल मीडियावर ते दोघे कायम सक्रिय असतात. वेगवेगळे व्हिडीओ तसेच  फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.  

टॅग्स :गणेशोत्सव 2024रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासोशल मीडिया