Join us

'तांबडी चामडी...' गाण्यावर रितेश-जिनिलियाचा भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 5:18 PM

रितेश-जिनिलियाचा मित्रमंडळींसोबत 'लयभारी 'डान्स, नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक. 

Riteish Deshmukh Video: रितेश-जिनिलियाकडे मराठी सिनेसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्राचे दादा -वहिनी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंगही आहे. गेले काही दिवस रितेश शूटिंगच्या निमित्ताने परदेशात होता. आता तो परत आल्याने मित्रमंडळींसोबत वेळ घालवताना दिसतोय.

नुकताच रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये जिनिलियासह त्यांचे मित्रमंडळी  बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात आता त्यांचा हा नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

'तांबडी चामडी चमकते उन्हात...'  या ट्रेडिंग गाण्यावर रितेश आणि त्यांची  स्क्वॅडने जबरदस्त डान्स केला आहे. डोळ्यांना गॉगल लावून गाण्याचा तालावर थिकरले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख ही सगळी कलाकार मंडळी रितेश-जिनिलीयासोबत धमाल करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने 'बेस्ट कपल' अशी कमेंट केली आहे.

'लयभारी' नंतर रितेश-जिनिलिया 'वेड' या सिनेमात एकत्र दिसले होते. त्यांचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. लवकरच रितेश देशमुख 'हाऊसफुल्ल-५' या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जिनिलिया सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया