Join us

भावांनी केलं औक्षण अन्... आईच्या वाढदिवसाला गैरहजर असलेल्या रितेशने दाखवला सुंदर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:45 PM

मराठी सिनेसृष्टीतील 'लय भारी' अभिनेता अशी रितेश देशमुखची ओळख आहे.

Riteish Deshmukh Video : मराठी सिनेसृष्टीतील 'लय भारी' अभिनेता अशी रितेश देशमुखची ओळख आहे. अलिकडेच तो 'बिग बॉस' मराठीमुळे चर्चेत आला होता. त्यामुळे अभिनेत्याचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊला प्रेक्षक कायमच प्रेम देताना दिसतात. दरम्यान, नुकताच रितेश देशमुखनेसोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

'बिग बॉस मराठी'नंतर रितेश त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी परदेशात रवाना झाला आहे. दरम्यान, रितेश लंडनमध्ये 'हाऊसफुल्ल- ५' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे रितेश त्याच्या आईच्या वाढदिवसाला गैरहजर राहिला. अशातच अभिनेत्याने त्याच्या इनस्टाग्राम अकाउंटवर आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

रितेश देशमुखने "Happy Birthday Aai !!!!!! I love you" असं कॅप्शन देत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये त्याचे भाऊ अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी आईचा वाढदिवस सेलिब्रेट करतानाचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. दोन्ही भावांनी वैशाली देशमुख यांचं औक्षण करून केक कापला आहे. देशमुख भावंडांनी केलेल्या कृतीचं नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओवर बॉलिवूड कलाकारांनी वैशाली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया