Join us

"अशोकचा अपघात झालेला तेव्हा मी बाप्पाकडे..." सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:55 IST

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांकडे पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक सिनेमात अशोक सराफ हमखास दिसतात.

Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला. सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांकडे पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक सिनेमातअशोक सराफ हमखास दिसतात. 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास', 'नवरा माझा नवसाचा', 'एकुलती एक' अशा प्रत्येक सिनेमांमध्ये सचिन - अशोक या जोडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.  

नुकतीच सचिन-सुप्रिया यांनी एक मुलाखत दिली. 'इट्स मज्जा' ला दिलेल्या या मुलाखती दरम्यान त्यांनी अशोक सराफ यांचा झालेल्या भयानक अपघाताचा एक प्रसंग सांगितला. या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकरांना एक प्रश्न विचारण्यात आला. "तुमच्या खऱ्या आयुष्यात कोणता नवस पूर्ण झाला आहे? यावर उत्तर देताना सचिन म्हणाले, आयुष्यात मी नवस फारसे केले नाहीत. पण, नवस म्हणण्याऐवजी मी देवाकडे एक मागणं मागितलं, जेव्हा अशोकचा अपघात झाला होता. तो अपघात फार विचित्र होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो कदाचित काम करू शकणार नाही". 

पुढे सचिन पिळगावकर म्हणाले, "तेव्हा मी बाप्पाकडे साकडं घातलं होतं. त्यावेळी बाप्पाकडे मागितलं की बाप्पा आता मी दिग्दर्शक म्हणून तेव्हाच उभा राहिन जेव्हा अशोक अ‍ॅक्टर म्हणून माझ्यासमोर उभा राहिल. तेव्हाच मी स्टार्ट साउंड अ‍ॅक्शन आणि कट असं म्हणेन, त्याआधी म्हणणार नाही असं साकडं मी बाप्पाकडे घातलं; आणि बाप्पाने माझं म्हणणं ऐकलं. तो माझ्यासमोर उभा राहिला. मेकअप केला आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट साउंड म्हटलं. त्या चित्रपटाचं नाव 'अशी ही बनवाबनवी' आहे".

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफमराठी अभिनेतासिनेमा