Join us

क्या बात है! उपेंद्र लिमयेने घेतली नवी अन् महागडी BMW स्पोर्ट्स बाईक; किंमत जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:53 IST

अभिनेता उपेंद्र लिमये हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

Upendra Limaye : अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'जोगवा', 'यलो',' मुळशी पॅटर्न' या चित्रपटांमधून त्याने कायमच आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच अभिनेता उपेंद्र लिमयेचं 'अॅनिमल' या चित्रपटामुळे सर्वत्र कौतुक करण्यात आलं. मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अलिकडेच तो तेलूगु चित्रपटात काम करताना दिसला. सध्या अभिनेता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.  नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर  शेअर केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

उपेंद्र लिमयेने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तो एका गाडीच्या शोरूममध्ये गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तो एका गाडीवरील कपडा बाजूला करतो. त्याने "BMW G 310 GS"ही स्पोर्टस बाईक विकत घेतल्याचे दिसत आहे. त्यानंतर उपेंद्र लिमये ही बाईक चालवताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उमेशने कॅप्शनमध्ये लिहिले, "Welcome BMW G 310 GS" असं म्हणत त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. या स्पोर्ट्स बाईकची भारतीय मार्केटमध्ये किंमत जवळपास ३.८५ लाख रुपये इतकी आहे. 

दरम्यान, उपेंद्र लिमयेने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, अभिनंदन सर, तर आणखी एका नेटकऱ्याने, सुपर्ब असे म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

वर्कफ्रंट

अभिनेता उपेंद्र लिमयेने मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अलिकडेत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'संक्रांतिकी वास्तुनम' या  तेलुगू चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. त्यानंतर आता कोणता नवीन चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :उपेंद्र लिमये मराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया