Join us

११ रुपयांची भेट अन् आशीर्वाद...; अलका कुबल यांनी सांगितला शेतकरी जोडप्याचा 'तो' अविस्मरणीय प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:02 IST

९० च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका म्हणजे अलका कुबल.

Alka Kubal: ९० च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका म्हणजे अलका कुबल (Alka Kubal). वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक, चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम करुन त्यांनी प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं. अलका कुबल यांचं नाव जरी घेतलं तर पहिल्यांदा माहेरची साडी या चित्रपट त्यांनी साकारलेली लक्ष्मी डोळ्यासमोर उभी राहते. मराठी सिनेसृष्टीतील एक काळ त्यांनी गाजवला. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान, अलका कुबल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या अभिनय प्रवासातील एक अविस्मरणीय प्रसंग सांगितला आहे. 

नुकतीच अलका कुबल यांनी 'मिरची मराठी'ला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी एक खास आठवण शेअर केली. त्यादरम्यान, मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या, "एक शेतकरी जोडपं होतं आणि मी टेंटमध्ये आत जाऊन बसले होते. तेव्हा आमचे टेंट ओनर आले आणि म्हणाले ताई तुम्हाला भेटण्यासाठी एक जोडपं आलं आहे. तर मी म्हटलं काय काम आहे. तर म्हणे त्यांना माहेरच्या साडीतील लक्ष्मीला भेटायचं आहे म्हणून ते आले आहेत. त्यांना माझं नाव अलका कुबल आहे हे देखील माहित नव्हतं."

पुढे त्या म्हणाल्या, "तर मी त्यांना भेटण्यासाठी गेले तर पाहिलं तर फाटके कपडे, ठिगळं लावलेली साडी त्या महिलेने नेसली होती. ते दोघेही गरीब होते. जे काही त्यांचं प्रेम होतं ते पाहून असं वाटलं खरंच यामुळे आपण आहोत. त्यानंतर त्या महिलेने कनवटीला लावलेले पैसे शिवाय तिच्या नवऱ्याकडून घेऊन असे ११ रुपये मला भेट दिले. मी आयुष्यात कोट्यवधींची कमाई केली असेल पण ही कमाई आणि त्यांचा आशीर्वाद हे असं प्रेम मला मिळालं आहे."

टॅग्स :अलका कुबलसिनेमासेलिब्रिटी