Hemal Ingle Mehendi Ceremony : 'अशी ही आशिकी' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री हेमल इंगळे (Hemal Ingle) प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटानंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. सध्या हेमल तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री तिचा रोनक चोरडियासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, यंदा ऑगस्ट महिन्यात हेमलचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर थायलंडमधील बॅचलर पार्टी आणि मग केळवणा या सगळ्यामुळे तिच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता येत्या काही दिवसात ती लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
अलिकडेच हेमलच्या घरी ग्रहमख विधी पार पडला. त्यानंतर आता अभिनेत्रीची लगीनघाई सुरु झाली आहे. नुकताच हेमलने सोशल मीडियावर तिच्या मेहंदी सोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलंय. व्हिडीओमध्ये हेमल आणि - रोनक आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी बसलेले पाहायला मिळत आहेत. हेमलने मेहंदीसाठी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर तिचा होणारा नवरा रोनकने पांढरी शेरवानी घातली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अभिनेत्री बोहल्यावर चढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल आणि रौनक लग्नगाठ बांधणार आहेत.
दरम्यान, हेमल इंगळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर 'अशी ही आशिकी' या चित्रपटात तिने अभिनय बेर्डे स्क्रीन शेअर केली होती. शिवाय अलिकडेच ती 'नवरा माझा नवसाचा- २' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, स्वप्नील जोशी यांसारख्या नावाजलेल्या, दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.