Join us  

"महालक्ष्मी माते की जय..." अभिनेत्री क्रांती रेडकर अंबाबाई चरणी लीन; पतीसह घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 1:34 PM

मराठी मनोरंजन विश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर.

Kranti Redkar : मराठी मनोरंजन विश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. 'जत्रा' फेम अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. पण असं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. क्रांती इंटरनेटवर आपल्या गोंडस मुलींचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. 

क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टा ग्रामवर क्रांतीने नवऱ्याबरोबर देवदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हे जोडपं कोल्हापुरच्या  अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलं आहे.  क्रांतीने व्हिडिओला "महालक्ष्मी माते की जय" असं कॅप्शन  दिलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या खूप कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने केलेल्या एका कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये अंबाबाईचं दर्शन घेताना क्रांती डोक्यावर ओढणी घेते तर तिचे पती समीर वानखेडे डोळ्यांवरचा चष्मा काढतात. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्सनी या जोडप्याच्या संस्कारांच कौतुक केलं आहे. 

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी २०१७ मध्ये  लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा असे त्यांच्या मुलींची नावे आहेत. क्रांती आणि समीर यांचा अगदी सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेकोल्हापूरअंबादेवी संस्थानसोशल मीडियासोशल व्हायरल