Join us

"गावात तरुण माणसं कमी होत चालली आहेत, कारण...; मृण्मयी देशपांडेने सांगितली वस्तुस्थिती, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:48 IST

मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेकडे (Mrunmayee Deshpande) पाहिलं जातं.

Mrunmayee Deshpande: मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेकडे (Mrunmayee Deshpande) पाहिलं जातं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर एक ठसा उमटवला आहे.  रुपेरी पडद्यावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी मृण्मयी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत येते. सध्या २०२० पासून मृण्मयी मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली आहे. तेथील आपल्या शेतातील सुंदर फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती आपल्याबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सध्या गावाकडची परिस्थिती तसेच अनेस समस्यांवर भाष्य केलं आहे.

'आरपार ऑनलाईन' सोबत खास बातचीत करताना मृण्मयीने सध्याच्या गावाकडच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्यावेळी मृण्मयी म्हणाली, "पूर्वीच्या काळी एकमेकांच्या शेतामध्ये अख्खच्या अख्खं गाव काम करायचं. तेव्हा बोलवण्याची पद्धत नव्हती. आता गावामध्ये माणसं मिळत नाहीत. गावंच्या गावं म्हातारी झाली आहेत. तरुण माणूस औषधाला सुद्धा सापडत नाही. कारण सगळ्या तरुणांची मुंबईला खोली असल्याशिवाय लग्न होत नाहीत. तर तिकडे जाऊन ही मुलं धुणी-भांडी करतील सगळं करतील पण त्यांना शेतात काम करायचं नाहीये. हे जे गावामध्ये पिकवलं जातंय ते तुमच्या ताटामध्ये येतंय."

पुढे अभिनेत्री म्हणते, "पण त्यांच्यामुळे विषमुक्त असलेलं अन्न आपण खात आहोत. शेतीचं काम हे मेहनतीचं आहे. याच्यासाठी माणसंच लागतात. तण काढण्याचं काम असो किंवा दुसरं कोणतीही काम असो त्यासाठी माणसं लागतात. "

दम्यान, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा  स्वप्नील रावने ‘नील अँड मोमो’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसेलिब्रिटीसोशल मीडिया