Join us

"जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसले..." प्राजक्ता माळीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:16 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Prajakta Mali : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची प्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेल ‘फुलवंती’(Phulwanti) हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळीने(Prajakta Mali) ‘फुलवंती’ची भूमिका साकारली आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळतंय. 'फुलवंती'मध्ये प्राजक्ताने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.  सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनदम्यान प्राजक्ता वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. त्यावेळी तिने आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे.

नुकतीच प्राजक्ता माळीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखती अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली," माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की ज्या माणसांवर मी विश्वास ठेवला त्याच माणसांनी माझं नुकसान केलं. परत त्यानंतर मला अशी काही माणसं मिळाली, जेव्हा मला मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते तेच मला या सगळ्यातून तारू शकतील, असं वाटलं. त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण तेव्हा मला आतून जे वाटलं ते मी करत राहिले.आणि आज या गोष्टीमुळे मला खूप आनंद होतोय की ते सगळं पूर्णत्वाला येतंय. मला असं वाटतं या स्टोरींने जसं सांगितलंय तसाच माझा प्रवास राहिलाय. या प्रवासात माझ्या घरच्यांनी कधीच साथ सोडली नाही. ते कायम माझ्यासोबत राहिले". 

पुढे अभिनेत्री म्हणाली, "इतके चढ उतार असतानाही ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. मला एका क्षणाला माझी आई म्हणत होती, तुला घर विकायचं असेल तर विक काही हरकत नाही. पैसे कमी पडतायत टाकावे लागतायत तर टाक. शेड्यूल कॉल ऑफ होतंय तर तसं करू नको. तू घर विक आणि हा चित्रपट पूर्ण कर. मला माहिती आहे हा चित्रपट सक्सेसफुल होणार आहे आणि तू अशी चार घरं उभी करणार आहेस. हे माझं आणि आईचं रात्री साडेबार वाजताचं बोलणं होतं. अवघ्या १५ दिवसांवर शूट होतं आणि ते लागत नव्हतं. या लेव्हलला फॅमिली सपोर्ट असतो ना की त्यांना माझ्यावर विश्वास आहे की मी आतापर्यंतची सगळी जमापुंजी पणाला लावली तरी देखील ते माझ्या बाजूने उभे आहेत. तेव्हा मीच शेड्यूल कॉल ऑफ केलं होतं कारण आतापर्यंत जमावलेली पुंजी मी अशी नाही लावू शकत. तरीही त्यांनी मला सपोर्ट केला. सेकंड शेड्यूलला तर माझा भाऊ आणि दोघेही माझ्यासाठी सेटवर आले होते". 

टॅग्स :प्राजक्ता माळीसिनेमासेलिब्रिटी