Join us

"मी सोशल मीडिया बंद केलं कारण...", संस्कृती बालगुडेचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:09 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम चर्चेत येत असते.

Sanskruti Balgude: लोकप्रिय मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) कायम चर्चेत येत असते. अभिनयाबरोबरच संस्कृती तिच्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 'पिंजरा' मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत स्वत: च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, तिच्या या अभिनय प्रवासात अभिनेत्रीला काही चांगले- वाईट अनुभवही आले. याबद्दल आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं आहे.

नुकतीच संस्कृती बालगुडेने 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मत मांडलं. त्यादरम्यान ती म्हणाली, "२०१६-१७ मध्ये एका चित्रपटाच्या दरम्यान माझं प्रचंड ट्रोलिंग झालं. कारण, तेव्हा मी ज्या काही पद्धतीने बोलायचे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. तेव्हा मी खूप डिप्रेस झाले होते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वगैरे बंद केलं होतं. म्हणलं की, लोकं असं कसं बोलू शकतात? मग मी आईला विचारलं की, मी खरंच ओव्हर अ‍ॅक्टिंग करते का? त्यावर ती म्हणाली, 'जाऊदे तू ते वाचत जाऊ नकोस'. त्यामुळे एका महिन्यासाठी सोशल मीडिया बंद केलं होतं. पण, आता मला त्याचं काहीच वाटत नाही, उलट आता हसायला येतं." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये केला. 

वर्कफ्रंट

संस्कृतीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'सांगतो ऐका', 'शॉर्टकट', 'निवडुंग', 'टेक केअर गुड नाईट', 'भय', 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना ती दिसली. 'काळे धंदे' या वेब सीरिजमध्येही संस्कृतीने काम केलं आहे.  

टॅग्स :संस्कृती बालगुडेमराठी चित्रपटसोशल मीडिया