Shruti Marathe : अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) सध्या तिचा आगामी चित्रपट 'गुलाबी'मुळे चर्चेत आली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्रीबरोबरच श्रुती निर्मातीदेखील आहे. श्रुतीने दिवंगत अभिनेते अतुल परचुरेंसोबत (Atul Parchure) 'जागो मोहन प्यारे' या मालिकेत काम केलं. या मालिकेच्या माध्यमातून अतुल यांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रुती अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाल्याची पाहायला मिळाली.
श्रुती मराठेने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अतुल परचुरेंसोबतच्या आठवणींना उजाला दिला. त्या दरम्यान अभिनेत्री म्हणाली, "आमचं खूपच सुंदर बॉण्डिंग होतं. कारण प्रत्येक सीनमध्ये आम्ही दोघं असायचो. तो माझ्यासाठी सिनियर होता. मला कधीच असं वाटलं नव्हतं की आमची अशी मैत्री होईल. एकतर तो परुष आणि आमच्या वयातही बरंच अंतर होतं. शिवाय दोघांचा अनुभवही वेगळा".
पुढे अभिनेत्री म्हणाली, "पण आमच्यामध्ये चांगली बॉण्डिंग झाली. की जेव्हा मला अतुल परचुरे गेल्याची बातमी कळली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी त्याला मिस करेन. आता मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते तेव्हा मी युट्यूबवर 'जागो मोहन प्यारे' चे एपिसोड बघते".