Join us

"आमचं प्रेम कसं...", हेमंत ढोमे-क्षिती जोगच्या लग्नाचा Video तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 18:44 IST

हेमंत हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

Hemant Dhome Kshitee-jog Wedding Video : अभिनेता हेमंत ढोमे आता दिग्दर्शक म्हणूनही नावारुपाला येत आहे. त्यानं दिग्दर्शित केलेला 'फसक्लास दाभाडे' (Marathi Movie Fussclass Dabhade) हा सिनेमा 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं हेमंतनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ  हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या लग्नाचा आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची खूपच चर्चा आहे. हा व्हिडीओ हेमंतनं त्याची बायको आणि अभिनेत्री क्षिती जोग हिला देखील टॅग केला आहे. 

हेमंत आणि क्षिती यांच्या सुखी संसाराला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.  2012 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. या लग्नातील खास क्षण त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. 'व्हिडिओ जुना आहे पण गाणं नवं आहे! बाकी ते आमचं प्रेम कसं आहे वगैरे तुम्हाला माहितीच आहे!  ते जाऊद्या, गाणं कसं वाटलं ते सांगा! फसक्लास दाभाडे 24  जानेवारी पासून फॅमिली सकट चित्रपटगृहात!", असं कॅप्शन हेमंतने या व्हिडीओला दिलं आहे. कलाकारांसोबत चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्स केल्या आहेत. 

हेमंत आणि क्षितीची हटके लव्हस्टोरी

हेमंत आणि क्षिती यांची पहिली भेट 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलवेळी झाली होती. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होती. पण, सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि नंतर आयुष्यभराच्या सहजीवनाचा निर्णय घेण्यामध्ये झालं. क्षिती हेमंतपेक्षा 3 वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याच बॅलन्स संभाळत या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. 

टॅग्स :Hemant Dhome Today Newsमराठी अभिनेतामराठी चित्रपटलग्न