मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांची सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. आता केदार शिंदे यांनी एका वेगळ्याच मुद्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.सध्या राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो आपल्या बळीराजाच्या. आता परतीच्या पावसाने शेतकºयांना रडवलं आहे. येत्या दिवसांत राज्यांत अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी थेट वरूण राजाकडेच गाऱ्हाणं मांडलं आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट पोस्टसोबत केदार शिंदे यांनी फोनवर बोलतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. जणू ते वरूण राजाशी फोनवर बोलत आहेत. पोस्टमध्ये ते लिहितात, ‘हॅलो वरूणराजा, आता बास करा की. आधीच दोन अडीच वर्षात परिस्थिती बिकट म्हणून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय आणि तुम्ही रोज हजेरी लावून सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतताय. प्रत्येक गोष्ट त्या त्या सीझनला झालेली चांगली असते. पाऊस हवाच हो पण तो आता या महिन्यात नको आणि पुढेही नको...’
केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखलं जाणारं नाव आहे. केदार शिंदे हे एक दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि लोककला सादरकर्ते आहेत. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केले. प्रत्येक कलाकृतीमधून मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला रिलेट होतील असे विषय केदार शिंदे यांच्याकडून सहज हाताळले जातात. ‘अगं बाई अरेच्चा’ या गाजलेल्या चित्रपटापासून ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेपर्यंत अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली आहे.