Join us  

"नियमांच्या नावाखाली पैशांची वसूली..."; दिग्दर्शकाने झाडावर चढून केलं आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:42 PM

मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक प्रवीण मोहारे यांनी शिवाजी पार्कवर झाडावर चढून आंदोलन करुन त्यांच्या मागण्या मांडल्यात (pravin mohare)

मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीणकुमार मोहारे यांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन केलंय. आज सकाळी त्यांनी झाडावर चढून आंदोलन केलं. पुढे अग्निशमन दलातील जवानांनी त्यांना खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रवीणकुमार यांनी झाडावर बसूनच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांच्या आंदोलनाचं कारण सांगितलं.

प्रवीण कुमार यांचं नेमकं म्हणणं काय?

प्रवीण कुमार मोहारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी पत्र लिहिलंय. यात ते लिहितात, "सेन्सॉर बोर्डामधूनअॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या नियमांना हटवण्याची मागणी त्यांनी केलीय. सिनेमात प्राण्यांंचा वापर केल्याने सेन्सॉर बोर्डामार्फत AWBI (animal welfare board of india) निर्मात्यांकडून ३० हजार रुपये नियमांच्या नावाखाली वसूल करतात. हे नियम बदलावेत", अशी मागणी प्रवीणकुमार यांनी केलीय. त्यांनी नुकताच 'शिरच्छेद प्रेमाचा' हा सिनेमा बनवलाय. 

अॅनिमल वेल्फेअरच्या नावाखाली निर्मात्यांकडून पैसे वसूली

प्रवीण कुमार मोहारे हे २०१४ मध्ये सेन्सॉरबोर्ड भ्रष्टाचारविरोधात कार्यकर्ते म्हणून सहभागी होते. २०१४ साली राकेश कुमार हा निर्मात्यांना नियमांच्या नावाखाली लुबाडत होता. प्रवीण कुमार यांनी तक्रार दाखल केल्याने राकेश कुमारला अटक होऊन त्यांना सेन्सॉर बोर्डाने हटवलं.

प्रवीण कुमार म्हणतात, "सिनेमात कोंबडी, गाय, बैलगाडी असा प्राण्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ३० हजार रुपये भरा आणि सीन पास करुन NOC घ्या, असा AWBI चा नियम असल्याचं सेन्सॉर बोर्ड सांगतं. यामुळे निर्माते-दिग्दर्शकांना ब्लॅकमेल केलं जातं. सिनेमात बैलगाड्या, कोंबड्या आणि आपली संस्कृती दाखवली तर त्यांना प्राण्यांवर अन्याय झाला असं वाटतं. आता आम्ही उघडे बनवायचे का, असा संतप्त सवाल प्रवीण कुमार यांनी विचारलाय. अशाप्रकारे शिवाजी पार्क परिसरात झाडावर चढून त्यांनी आंदोलन केलं. पुढे अग्निशमन दलातील जवानांनी त्यांना खाली उतरवलं.

टॅग्स :मराठीमराठी चित्रपट