Pravin Tarde Video : प्रवीण तरडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले प्रवीण तरडे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सध्या मात्र सिनेमा जरा बाजूला ठेऊन हा रांगडा गडी शेतीत रमला आहे. होय, शेतीत राबतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
फेसबुकवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. काळ्या मातीत मातीत तिफन चालते... बॅकग्राऊंडला हे गाणं आणि शेतात बैलजोडी घेऊन चिखल तुडवणारे प्रवीण तरडे असा हा व्हिडीओ पाहून कोणत्याही मराठी माणसाचा ऊर भरून यावा.
या व्हिडीओला प्रवीण तरडेंनी दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी आहे. ‘हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात .. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.‘दिखाऊ हिरो बरेच पाहिले, पण माझ्या भोर वेल्हा मुळशीच्या या अस्सल हिरोची बातच वेगळी आहे. आपण जे भात लावणीला कष्ट करतो, तेवडा आपल्याला मोबदला मिळत नाही. इंद्रायणी बासमती सारखा ब्रँड बनला पाहिले आणि तो फक्त तुम्हीच करू शकता,’ अशी कमेंट एका चहत्याने केली आहे. ‘आणि हा चिखल राबतानाचा आहे.. फोटो काढण्यासाठीचा नाही हे महत्त्वाचं,’ अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे.
नुकताच प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रवीण दरडे यांनी दिग्दर्शित केला होता. श्विाय या चित्रपटात त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिकाही साकारली होती. हा चित्रपट तुफान गाजला. पहिल्या तीनच दिवसात या सिनेमाने ८.७१ कोटींची कमाई केली होती.