Join us

"माझ्या घरात मी बॉस, पण माझी बायको...", लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त रवी जाधव यांची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:35 IST

लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने रवी जाधव यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.  त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पत्नीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

रवी जाधव हे मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. 'टाइमपास', 'बालक पालक', 'नटरंग', 'अनन्या', 'बॅन्जो' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. समाजातील वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चित्रपटातून भाष्य करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. रवी जाधव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते आगामी प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करताना दिसतात. लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने रवी जाधव यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पत्नीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव मेघना असं आहे. या फोटोला त्यांनी "माझ्या घरात मी बॉस आहे. पण, माझी बायकोच सगळे निर्णय घेते. आपल्या दोघांसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल थँक्यू. लग्नाच्या २५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींनीही रवी जाधव व त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, रवी जाधव 'मै अटल हूं' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. रवी जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी 'ताली' या वेब सीरिजमुळे ते चर्चेत होते. 

टॅग्स :रवी जाधवमराठी अभिनेतासेलिब्रिटी