Join us

"महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक.."; चिन्मय मांडलेकरच्या निर्णयावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 9:29 AM

चिन्मय मांडलेकरने पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. त्यावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट चर्चेत आहे (chinmay mandlekar, sameer vidwans)

काल चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर पोस्ट करुन ट्रोलिंगला वैतागून पुन्हा शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला. चिन्मयला गेल्या काही दिवसांपासून त्याचा मुलगा जहांगीरच्या नावाने विचित्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चिन्मयने यापुढे महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला. यावर मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने खास पोस्ट केलीय. 

'डबल सीट', 'आनंदी गोपाळ' सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू नेहाआणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाहीये! त्यांना ते माहीत असतील, असंही मला वाटत नाही!"

समीरने पुढे लिहिलंय की, "चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मी घे! आणि ज्या श्रध्देने तू महाराजांची भुमिका करतोस ती करत रहा!" अशी पोस्ट लिहून समीरने चिन्मयला पाठिंबा दिला असून पुन्हा महाराजांची भूमिका करावी ही विनंती केलीय. दरम्यान काल चिन्मयचा व्हिडीओ प्रसिद्ध झालयावर मराठी कलाकारांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी चिन्मयला निर्णय मागे घेण्याची विनंती केलीय. 

टॅग्स :चिन्मय मांडलेकरसमीर विध्वंसआनंदी गोपाळछत्रपती शिवाजी महाराज