Join us  

भर पावसात कामाला निघाला प्रसिद्ध दिग्दर्शक, शेअर केला व्हिडिओ; दाखवली सत्यपरिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 4:43 PM

सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Sameer Vidhwans Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.  अशातच एका मराठी दिग्दर्शकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आज दिवसभरात मुंबईत पावसाची संतत धार सुरू असल्याने शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एकंदरीत शहरातील वाहतूक मंदावली आहे. याचा फटका कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे. शिवाय हवामानशास्त्र विभागाने मुंबईत आज रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान,  सोशल मीडियावर समीर विद्वांस या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

'मला काही प्रॉब्लेम नाही' , 'व्हाय झेड', 'धुरळा', 'टाइम प्लीज', 'डबल सीट' , 'आनंदी गोपाळ' यांसारख्या चित्रपटांचे  समीर विद्वांसने दिग्दर्शन केले आहे. 'सत्यप्रेम की कथा' या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. बऱ्याचदा समीर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडताना दिसतो. नुकताच त्याने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यातून समीर कामावर जात आहे. आपल्या कारमधून त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. या इन्स्टाग्राम व्हिडीओवर दिग्दर्शकाने "गाडीची होडी आणि मनाचं वल्हं करा आणि कामाला जा" असं लक्षवेधी कॅप्शन देखील लिहलं आहे. समीरने पोस्ट केलेल्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :समीर विध्वंससेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल