Join us  

दिवाळीत आजमावणार मराठी चित्रपट दम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:14 AM

मराठी फिल्म इंडस्ट्रीचा आत्तापर्यंतचा प्रवसा पाहिला तर ऐन दिवाळीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करण्यास निमार्ते फार इच्छुक नसायचे. याचे कारण ...

मराठी फिल्म इंडस्ट्रीचा आत्तापर्यंतचा प्रवसा पाहिला तर ऐन दिवाळीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करण्यास निमार्ते फार इच्छुक नसायचे. याचे कारण म्हणजे दिवाळीमध्ये सर्वजण घरीच आनंद साजरा करत असताना थिएटरमध्ये जाऊन पिक्चर कोण पाहणार अशी शंका त्यांना येत होती. मात्र, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  स्वप्नील व सुबोधचा गेल्या वर्षांचा प्रवास पाहिला तर हे दोघेही स्वत: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कष्ट करत असल्याचे दिसून येते. मराठी रसिकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या स्वप्नील- सुबोधने आता दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचे आव्हानही स्वीकारले आहे.मुंबई-पुणे-मुंबई २ 'मुंबई-पुणे-मुंबई २ -लग्नाला यायचंच' ही अगदी स्वप्नीलटाईप मुव्ही आहे. मुक्ता बवेर्सोबतची त्याची केमीस्ट्री नेहमीच रंगते आणि ती या चित्रपटात अगदी मॅजीक करतेय, असे प्रोमोजवरून दिसत आहे. त्याचबरोबर प्रशांत दामले प्रथमच वडिलांच्या भूमिकेत पाहणेही वेगळे ठरणार आहे. स्वप्नील- प्रशांत ही बापलेकांची जोडी लग्नात धमाल करणार हे निश्‍चित. त्यामुळे पूर्णपणे कौटुंबिक आणि नात्यांचा आनंद देणारा हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी पाहण्यासारखी मजा नाही. कट्यार काळजात घुसलीदिवाळीच्या पारंपरिक उत्साहात मराठी नाटकाची भव्यता अनुभवयाची संधी ‘कट्यार काळजात घुसली'च्या प्रेक्षकांना मिळणार आहे. अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सुबोधभावे यांनी निर्मितीचे शिवधनुष्य पेलतानाच प्रमुखभूमिका अगदी झोकात साकारली आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि राजे रजवाड्यांची भव्यता यामुळे कट्यार काळजात घुसणार हे निश्‍चितच. दिवाळीच्या उत्साहात प्रेक्षक थिएटरपर्यंत जाईल का या शंकेने अनेक ऐन दिवाळीत चित्रपट प्रदर्शन करण्याची हिंमत दाखवित नव्हते. बिगबजेट सिनेमाच दिवाळीचा सगळा काळ व्यापून टाकत होते. आता मराठी सिनेमाने हे आव्हान स्वीकारले असून यंदाच्या पाडव्याला दोन बिगबजेट मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा असली तरी गुरूवारी पाडव्याच्या दिवशी रसिकांना खर्‍या अथार्ने दिवाळीची भेट मिळणार आहे. 'मुबंई- पुणे- मुंबई २'आणि कट्यार काळजात घुसली हे पाडव्याला प्रदर्शित होणारे पहिले चित्रपट ठरणार आहेत.एक वर्ष मागे...गेल्या वर्षी शुक्रवारीच पाडवा आला होता. या दिवशी 'प्यावाली लव्ह स्टोरी'हा स्वप्नील जोशीचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या वर्षी मात्र स्वप्नीलने 'मुंबई-पुणे-मुबंई २'गुरूवारी प्रदर्शित करण्याची हिंमत दाखविली आहे. नाणेच खणखणीत असेल तर ते चालणारच ही हिंमत आता मराठी चित्रपटांमध्येही आली आहे, हेच यातून दिसून येत आहे. स्वप्नील जोशी- मुक्ता बर्वेच्या लग्नाची गोष्टअसणारा 'मुंबई- पुणे- मुंबई २' आणि मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेलले नाटक रुपेरी पडद्यावर आणण्याची सुबोध भावे याची कामगिरी असलेलले 'कट्यार काळजात घुसली'हे दोन चित्रपट पाडव्याच्या दिवशी प्रदर्शित होत आहेत. सलमान खान ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करतो, शाहरुख वर्षअखेरीस रसिकांना आपल्या चित्रपटाची गिफ्ट देतो, तसा ट्रेंड आता मराठीतही सुरू होताना दिसतोय.