​मराठी, हिंदी नंतर आता सुबोध बंगालीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2016 07:10 AM2016-05-24T07:10:36+5:302016-05-24T12:40:36+5:30

बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर अभिनेता सुबोध भावे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

Marathi, Hindi now and now in Subodh Bengali! | ​मराठी, हिंदी नंतर आता सुबोध बंगालीत!

​मराठी, हिंदी नंतर आता सुबोध बंगालीत!

googlenewsNext
लगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर अभिनेता सुबोध भावे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.  या चित्रपटा अगोदर सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘अय्या’ या हिंदी चित्रपटात सुबोधने काम केले होते. ‘अर्धांगिनी- एक अर्धसत्य’ या चित्रपटात‘निखिलेश’ या भूमिकेतून सुबोध भावे परत एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा रविंद्रनाथ टागोर (१९१४) लिखित ‘घरे-बैरे’ या कादंबरीवर आधारित असून हिंदी आणि बंगाली दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

मराठी कलाकार सुबोध भावेसोबत अभिनेत्री रिमा लागू आणि वर्षा उसगांवकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘अर्धांगिनी- एक अर्धसत्य’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन तसेच निर्मिती रिमा मुखर्जी यांनी केली आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हिंदी आणि बंगाली या दोन भाषेच्या चित्रपटात सुबोध भावेला पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर अभिनेता सुबोध भावे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.  या चित्रपटा अगोदर सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘अय्या’ या हिंदी चित्रपटात सुबोधने काम केले होते. ‘अर्धांगिनी- एक अर्धसत्य’ या चित्रपटात‘निखिलेश’ या भूमिकेतून सुबोध भावे परत एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा रविंद्रनाथ टागोर (१९१४) लिखित ‘घरे-बैरे’ या कादंबरीवर आधारित असून हिंदी आणि बंगाली दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

मराठी कलाकार सुबोध भावेसोबत अभिनेत्री रिमा लागू आणि वर्षा उसगांवकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘अर्धांगिनी- एक अर्धसत्य’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन तसेच निर्मिती रिमा मुखर्जी यांनी केली आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हिंदी आणि बंगाली या दोन भाषेच्या चित्रपटात सुबोध भावेला पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

Web Title: Marathi, Hindi now and now in Subodh Bengali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.