Join us

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:14 PM

Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे.

सध्याच्या काळात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. त्यामुळे राजकारण असो वा कलाविश्व सातत्याने या दोन्ही क्षेत्रात काही ना काही घडत असतं. यामध्येच येत्या २८ जुलैपासून आणीबाणी (anibani) लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, ही आणीबाणी नेमकी कशासाठी आणि का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकंच कशाला या आणीबाणीला प्रविण तरडे (pravin tarade), उपेंद्र लिमये (upendra limaye), सयाजी शिंदे (sayaji shinde) यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा रंगली आहे.

२८ जुलैपासून लावण्यात येणाऱ्या या आणीबाणीमुळे जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला  मिळणार आहे.  कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्गज कलाकारांची मोट एकत्र बांधत दिनेश जगताप यांचा आणीबाणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून दिनेश जगताप पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तर या सिनेमाची निर्मिती दिनिशा फिल्मि्स अंतर्गत करण्यात येणार आहे.

आणीबाणीच्या काळातील पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटात अभिमन्यू या नायकाचा अफलातून संघर्ष पाहायला मिळणार आहे. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची कथा यात उलगडत जाणार आहे. तसंच राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करणारे लेखक अरविंद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर  ही रंजक कथा लिहिली आहे.

दरम्यान, ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात  मांडण्यात आली आहे. या सिनेमात  उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. 

टॅग्स :सिनेमाप्रवीण तरडेउपेंद्र लिमये सयाजी शिंदे