Join us  

पाच जन्मातील बायका अन् त्यांच्या इच्छा, स्वप्नील जोशीची उडाली तारांबळ; 'बाई गं' चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 1:00 PM

सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय.

अभिनेता स्वप्नील जोशीचा (Swapnil Joshi) आगामी 'बाई गं' (Bai Ga) सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात स्वप्नीलसोबत एक दोन नाही तर तब्बल सहा बायका म्हणजेच अभिनेत्री असणार आहेत. प्रार्थना बेहेरे, नेहा खान, दीप्ती देवी, आदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड या सहा अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. तर स्वप्नीलच्या जोडीला सागर कारंडेही आहे. सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय.

या जन्मातल्या बायकोशी मतभेद झाल्यानंतर देव स्वप्नीलसमोर गेल्या 5 जन्मातल्या बायका आणून उभं करतो. या ५ बायका त्याच्या ५ जन्मातल्या पत्नी असतात. त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी या जन्मात स्वप्नीलवर येते. यामध्ये स्वप्नीलची कशी तारांबळ उडते याची धमाल सिनेमात पाहता येणार आहे. सिनेमाचं शूट लंडनमध्ये झालं आहे. लंडनची सुंदर दृश्य ट्रेलरमध्ये दिसत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आता रिलीजची उत्सुकता आहे.

"बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट १२ जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीप्रार्थना बेहरेसुकन्या कुलकर्णीदीप्ती देवीमराठी चित्रपटमराठी अभिनेता