Join us

‘आनंदाने कसं जगायचं’ याचा वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या 'फनरल' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 5:31 PM

आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन जगण्याची उमेद देणारा असतो, हा संदेश देणाऱ्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळत आहे.

आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन जगण्याची उमेद देणारा असतो, हा संदेश देणाऱ्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळत आहे. आनंदाने कसं जगायचं’? हे सांगणारा चित्रपट मनाला नुसता भिडत नाही तर विचार करायला भाग पाडत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देतायेत. विविध शहरांतून, विविध वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे. देश विदेशातील चित्रपट महोत्सव गाजविल्यामुळे प्रेक्षकांनाही ‘फनरल’ चित्रपटाची उत्सुकता होती.

‘कसं जगायचं’ याचा वेगळा दृष्टीकोन या चित्रपटाने दिलाय पण जगण्यासोबत मृत्युलाही किती आनंदाने, समाधानाने सामोरं जाता येऊ शकतं त्याचा अत्यंत प्रत्ययकारी अनुभव हा चित्रपट आपल्याला देतो. आयुष्य कशा रितीने सुंदर आणि सकारात्मक होऊ शकतं हा संदेश देणारा ‘फनरल’ चित्रपट जरुर पहायला हवा अशा प्रतिक्रिया सुखावणाऱ्या आहेत. अगदी साध्या सोप्या भाषेत चित्रपटाची कथा फुलत जाते, मनाची पकड घेते आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवते. सोबत लेखन, दिग्दर्शन,अभिनय आणि चित्रपटाच्या तांत्रिक बाजू सुद्धा भक्कम आहेत. थोडा वेगळा विचार करून आयुष्य खरंच किती आनंददायी करता येऊ शकतं याचं ‘फनरल’ चित्रपट उत्तम उदाहारण आहे.

'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून दिसतंय.

टॅग्स :सिनेमा