Join us

Roop Nagar Ke Cheetey: ‘रूप नगर के चीते’मध्ये ग्लॅमरचा तडका, झकळणार ‘या’ चार अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:24 PM

Roop Nagar Ke Cheetey : ‘रूप नगर के चीते’ हा मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मैत्रीची एक अनोखी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोबत ग्लॅमरचा तडकाही आहेच...

‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar Ke Cheetey) हा मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या 16 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. मैत्रीची एक अनोखी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोबत ग्लॅमरचा तडकाही आहेच.दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा सांगणाऱ्या ‘रूप नगर के चीते’मध्ये करण परब (Karan Parab) आणि कुणाल शुक्ल (Kunal Shukla) हे दोन नवोदित कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मैत्रीचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरातील विरोधाभासी जीवन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण इतकंच नाही तर त्यांच्या सोबतीला चार अभिनेत्रीही आहेत. होय, मुग्धा चाफेकर, हेमल इंगळे, आयुषी भावे आणि सना प्रभू यांच्या ग्लॅमरचा तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुग्धा, हेमल, सना आणि आयुषी नेमक्या कोणत्या भूमिकांमध्ये झळकणार?दोन मित्रांच्या कथेत या चौघी नेमकं काय करणार? हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. पण तूर्तास या चौघींबद्दल जाणून घेऊ यात.

  मुंबईकर असलेल्या मुग्धाने टेलिव्हीजनवर खूप काम केलं आहे. ‘द सायलेन्स’ या मराठी चित्रपटासाठी तिनं पदार्पणातील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पटकावला आहे. ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज’ या गाजलेल्या मालिकेत मुग्धाने  राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली होती. 

हेमल इंगळे ही कोल्हापूरची आहे. वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवणाºया हेमलने ‘आशिकी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘1962’ या हिंदी वेब सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. छोटया पडद्यावरील ‘विद्रोही’ या मालिकेतील तिची चांगलीच गाजली होती.

सना प्रभूबद्दल सांगायचं तर ती मूळची रत्नागिरीची आहे. सध्या सना मुंबईतील युपीजी कॉलेजमध्ये  मास मीडिया अँड कम्युनिकेशन्समध्ये शिकतेय. 2018 मध्ये झालेल्या ‘मिस पुणे’ या सौंदर्यस्पर्धेत ती फायनलिस्ट  राहिलेली सना उत्तम डान्सर आहे. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

आयुषी भावे ही डान्सर आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्रोफेशनल डान्सर म्हणून ती काम करतेय. फराह खान, गीता कपूर, प्रभू देवा अशा अनेक दिग्गज कोरिओग्राफर्ससोबत तिने काम केलं आहे. 2018 मध्ये ती ‘श्रावण क्वीन’ची विजेती ठरली होती. ‘रूप नगर के चीते’ हा आयुषीचा पहिला सिनेमा आहे.

‘रूप नगर के चीते’ हा सिनेमा विहान सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केला आहे.  हा सिनेमा प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास सिनेमातील कलाकारांनी व्यक्त केला आहे. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणं महत्त्वाचं असल्याचं सांगत हा सिनेमा प्रत्येकाला निखळ आनंद देईल असा विश्वास दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :सिनेमामराठी अभिनेतासेलिब्रिटी