अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चाहते मोठ्या उत्सुकतेने या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत. खास म्हणजे, त्यांच्या सोबतीला त्यांच्या सौभाग्यवती स्रेहल तरडेही (Snehal Tarde) आहेत.
होय,खऱ्या आयुष्यातील ही जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार आहे. सिनेमात स्नेहल तरडे सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमातील प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते नेहमी अभिमानानं सांगतात.
२ डिसेंबर २००९ साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्न केलं. प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगा आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहेत. स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यात, देऊळबंद, चिंटू २ आणि व्हेंटिलेटर या चित्रपटांचा समावेश आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.